शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

'ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे प्रीतम मुंडेंना मंत्रिपद दिलं नसावं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:21 IST

Sachin Kharat on Pritam Munde and cabinet expansion: आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या, सचिन खरात यांची मागणी

ठळक मुद्देपंकजाताई आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या

मुंबई: नुकतचं नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांच्या जागी राज्यसभा खासदार भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी केल्यामुळे मंत्रिपद दिलं नसावं, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केले आहे.

सचिन खरात यांनी पंकजा मुंडेंना आता निर्णय घेण्याची विनंती केली आहे. याबाबत ते म्हणाले की, 'पंकजाताई, आपण ज्या भारतीय जनता पक्षात काम करत आहात, त्याच भाजपने मंडल आयोगाला विरोध केला होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते. मुंडे साहेब सतत ओबीसी समाजाचे प्रश्न संसदेत मांडायचे, याची आठवण आपण भाजपला करुन दिली. 24 जानेवारीला केंद्र सरकारकडे मागणी केलीत, की आम्हीही देशाचे आहोत, ओबीसी समाजाची जनगणना करा. ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिले नाही, असे दिसत आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या!' अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

'मुंडे भगिनींची बदनामी करू नका'काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन मुंडे भगिनींच्या नाराजीवर भाष्य केले. 'मुंडे भगिनी नाराज असल्याचे तुम्हाला कुणी सांगितले? उगाच काहीही बदनामी करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतो. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका,' असे ते म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस