शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी विधानसभेसाठी तयार : मंगळवारपासून तीन दिवस मुलाखती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:35 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार दि. २३ ते २५ या तीन दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवार यांच्या पुण्यातील घरी छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये २८८ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांकडून आलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातून सुमारे ८०० अर्ज आले आहेत. प्रत्येक जागेचा तपशील बारकाईने अभ्यासण्यात आला. तेथील पक्षाच्या ताकदीची माहिती घेण्यात आली. आता विधानसभानिहाय सर्व नेत्यांकडे  मुलाखतींची जबाबदारी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्याबाबत चर्चा झालेली नाही. काँग्रेसबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. पक्षाचे नेते, मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, असे पाटील यांनी नमुद केले.काँग्रेस व मित्रपक्षातील जागावाटपाविषयी बोलताना पाटील म्हणाले, जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. मंगळवारी किंवा बुधवारी पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये २२० जागांपर्यंतचे निर्णय होऊ शकतात. राज ठाकरे यांच्या आघाडीतील सहभागाबद्दल अद्याप चर्चा झाली नाही. त्यांच्याबाबत काँग्रेस किती अनुकूल आहे, याची माहिती नाही.प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही पक्षांकडून पत्र पाठविले आहे. धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

नेत्यांना सत्तेची मस्तीचंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा व शिवसेनेतील नेत्यांकडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच आघाडीच्या २० जागा निवडून येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावर टीका करताना पाटील म्हणाले, मोजायची सवय असणाºयांकडून अपेक्षा काय करायची. सत्तारूढ नेत्यांना किती मस्ती आहे, हे यावरून दिसते. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मोदींना मते दिली. हे आपल्याच मते दिल्याच्या अविर्भावात आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील