“प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावं, मी ६ वेळा सलग जिंकलोय”

By प्रविण मरगळे | Published: November 17, 2020 05:50 PM2020-11-17T17:50:45+5:302020-11-17T17:52:13+5:30

NCP Eknath Khadse, BJP Prasad Lad News: शरद पवार याठिकाणी आल्यास प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होऊ शकतं, त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली.

"Prasad Lad should be elected from the people once and for all, I have won 6 times, Eknath Khadse | “प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावं, मी ६ वेळा सलग जिंकलोय”

“प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावं, मी ६ वेळा सलग जिंकलोय”

Next
ठळक मुद्देशरद पवार याठिकाणी आल्यास प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होऊ शकतंराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्रातील दौरा पुढे ढकललाभाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या टीकेवर एकनाथ खडसेंनी लगावला टोला

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, सध्या पवारांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या जुंपल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला होता.

यावर भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी प्रसाद लाड यांनी जनतेतून एकदा निवडून येऊन दाखवावं, मी जनतेतून ६ वेळा सलग निवडून आलो आहे असं आव्हान दिलं आहे. तर शरद पवारांचा दौऱ्याला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने दौरा रद्द झाला आहे. शरद पवार याठिकाणी आल्यास प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होऊ शकतं, त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, परंतु आता त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ खडसेंची तडफड सुरु आहे. पण त्यांनीही काहीही केलं तरी भाजपा कमजोर नाही, आम्ही सक्षम आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं.

शरद पवार हे मोठे नेते आहेत, ५० वर्ष शरद पवार राजकीय दौरे करत आहे, राजकीय दौरे हा त्यांचा आवडीचा विषय आहे, परंतु एकनाथ खडसेंसाठी दौरा केल्याने भाजपाला फटका बसेल असं अजिबात नाही असंही प्रसाद लाड यांनी सांगितले. शरद पवार येत्या २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु शरद पवारांचा दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे.

अलीकडेच भाजपाला रामराम करत एकनाथ खडसेंनी मुलगी रोहिणीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले होते, पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसेंनी जळगावमधील मैदान भरून एकनाथ खडसेंची ताकद काय आहे ते दाखवून देऊ असं म्हटलं होतं, एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाला बळ देण्यासाठीच उत्तर महाराष्ट्रात शरद पवार दौरा करणार होते.

Web Title: "Prasad Lad should be elected from the people once and for all, I have won 6 times, Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.