शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Vanchit Bahujan Aghadi Candidate List: महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपांचा तिढा सुरू असतानाच इकडे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत सामील होणार का? अशीच चर्चा होत असतानाच वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी दहा उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील मतदारसंघांचा समावेश आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी दहा उमेदवार केले जाहीर

वंचित बहुजन आघाडीने दहा जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, मान, सांगली या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. 

मलकापूर विधानसभा मतदारसंघ - शहजाद खान सलीम खान (मुस्लीम)बाळापूर विधानसभा मतदारसंघ - खातीब सयद नातीक्वाद्दीन (मुस्लीम)परभणी विधानसभा मतदारसंघ - सयद सामी सय साहेबजान (मुस्लीम)औरंगाबाद मध्य मतदारसंघ - मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक (मुस्लीम)गंगापूर विधानसभा मतदारसंघ - सय्यद गुलाम नबी सय्यद (मुस्लीम)कल्याण पश्चिम मतदारसंघ - अयाज गुलजार मोलवी (मुस्लीम)हडपसर विधानसभा मतदारसंघ - मोहम्म अफरोज मुल्ला (मुस्लीम)मान विधानसभा मतदारसंघ - इम्तियाज जफर नदाफ (मुस्लीम)शिरोळ विधानसभा मतदारसंघ - आरिफ मोहम्मदाली पटेल (मुस्लीम)सांगली विधानसभा मतदारसंघ - अल्लाउद्दीन हयातचंद काझी (मुस्लीम)

वंचित बहुजन आघाडीने दुसरी यादी जाहीर केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा नारा

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीवेळी झाला होता. मात्र, सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली होती. लोकसभेत चांगली कामगिरी वंचितला करता आली नाही. 

वंचित बहुजन आघाडीने पहिल्या यादीत जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे.

आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच वंचितने २१ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीElectionनिवडणूक 2024