शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
4
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
5
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
6
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
7
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
8
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
9
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
10
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
11
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
12
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
13
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
14
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
15
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
16
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
17
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
18
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
19
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
20
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...

Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 14:15 IST

Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी

नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. याआधी फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या आहेत. त्यामुळे राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. (Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case)आरोपांची सखोल चौकशी होईल, पण कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर... : मुख्यमंत्रीपूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्यानं कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आहेत. त्यातला आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र पोलिसांनी तो आवाज कोणाचा आहे, ते सांगायला हवं. सत्य लोकांसमोर यायला हवं. पण पोलिसांवर दबाव असल्यानं त्यांच्याकडून सत्य लपवलं जातं आहे, असं फडणवीस म्हणाले. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आत्महत्येआधी पूजा चव्हाणनं पोस्ट केले होते हे फोटो; बोलक्या फोटोंमधून नक्की काय सांगायचं होतं?पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राठोड यांच्यावर झालेले आरोप पाहता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासाठी मैदान खुलं आहे. पोलिसांवरील दबाव दूर व्हायला हवा आणि सत्य समोर यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पूजा राठोड प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही, असं ठाकरे म्हणाले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भानं मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं मानलं जातं.मुख्यमंत्र्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना कदाचित घटनेचं गांभीर्य लक्षात आलेलं नसावं. त्यांनी कदाचित या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लीप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण