शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Death Case: गेले १५ दिवस कुठे होतात?; वनमंत्री संजय राठोड यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 14:25 IST

Pooja Chavan Death Case Sanjay Rathod gives explanation: संजय राठोड पहिल्यांदाच माध्यमांसमोर; घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोप

वाशीम: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide Case:) चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) अखेर १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. गेल्या १५ दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल होते. ते समोर येत नसल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राठोड मंत्रिपदी कायम आहेत.संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?संजय राठोड यांनी आज बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीला जाऊन दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूजा चव्हाणच्या निधनानं संपूर्ण समाजाला दु:ख झालं आहे. मी आणि संपूर्ण समाज तिच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. पण यावरून अतिशय घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं राठोड म्हणाले. माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असंदेखील त्यांनी सांगितलं."हात जोडून विनंती करतो की..."; पूजा चव्हाण प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड बोलले१५ दिवस कुठे होते संजय राठोड?पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड बेपत्ता झाले. ते नेमके कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाला राठोड यांनी उत्तर दिलं. 'दहा दिवस पत्नी, मुलंबाळं आणि कुटुंबाला सांभाळण्याचं काम केलं. त्यासोबतच शासकीय कामही सुरू होतं. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना सांभाळण्याचं काम गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे, असं राठोड म्हणाले.  फोटो, ऑडिओ क्लिबद्दल राठोड यांचं स्पष्टीकरणपूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा करण्यात आला. संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटोदेखील व्हायरल झाले. 'पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मला गोवण्यात आलं आहे. घाणेरडं राजकारण केलं जात आहे. मला तिच्या मृत्युचे दु:ख आहे. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. तपासात सर्व स्पष्ट होईल,' असं राठोड म्हणाले. माझी आणि समाजाची बदनामी करू नका, असं आवाहनदेखील त्यांनी हात जोडून केलं.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोड