शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Chitra Wagh : "आता मीच तुम्हाला पुरून उरणार, पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार आणि बोलत राहणार"

By बाळकृष्ण परब | Updated: February 27, 2021 13:03 IST

Chitra Wagh reacted after the ACB filed a case against her husband : चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे.

नाशिक - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (pooja Chavan Death case) आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले.  ("Now I will bury you, talk about Pooja Chavan and keep talking." Chitra Wagh's challenge to Mahavikas Aghadi )

या प्रकरणात पतीवर दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या की, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. किती तर म्हणे ९० टक्के बेहिशेबी मालमत्ता. मात्र याबाबतची माहिती मला अजून कळलेली नाही. जी कळली ती पत्रकारांकडून कळली. एफआयआरची कॉपीही व्हॉट्सअॅपवर मिळाली. प्रत्यक्ष कॉपी पाठवायला एसीबीकडील माणसं संपली का, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या प्रकरणात माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. जेव्हा हा प्रकार घ़डला, तेव्हा माझा नवरा त्या घटनास्थळाचा पाच किमी परिसरातही नव्हता. असेही त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीची अद्याप चौकशीही झालेली नाही, असा दावाही वाघ यांनी केला. 

याबाबत चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आज मला शरद पवार साहेबांची आठवण येत आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार साहेबांकडे मी गेले होते. त्यांना मी तक्रारीची कॉपी दिली. तेव्हा पवार साहेब म्हणाले की, यात तुझा नवरा कुठेच दिसत नाही. त्यानंतर याबाबत न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती लढाई आम्ही लढतोय.  या प्रकरणात आम्ही सहकार्याला तयार आहोत. तरीही माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जातोय. खरंतर यात मलाच अडकवायचं होतं. तशी चाचपणीही झाली होती. आता आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू. तसेच यावेळी अजून एक सांगू इच्छिते की, तुम्ही माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. तुम्हाला काय वाटतं गुन्हा दाखल झाला म्हणून मी गप्प बसणार, मी गप्प बसणार नाही. आता तुम्हाला मीच पुरून उरणार. नाहीतर माझं नाव चित्रा वाघ म्हणून सांगणार नाही. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला दिले. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघPooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण