शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

राजपूत समाजाच्या मतांसाठी भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणाचे राजकारण - गुलाबराव पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 21:47 IST

Gulabrao Patil : गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देभाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

जळगाव : भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी आहेत. राजपूत समाजाच्या आठ टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपाकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद असा नारा दिला जात आहे, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी भाजपाला लगावला.

गुलाबराव पाटील हे रविवारी सायंकाळी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा, बिहार निवडणूक, भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारी टीका अशा विषयांवर मते मांडली. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असताना विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, सीबीआयने तपास हाती घेतला.

दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. ही गोष्ट राज्य सरकार सांगत नाही, विरोधकांच्या आग्रहानुसार जी एजन्सी या प्रकरणाच्या तपासकामी नेमण्यात आली, तिच्या तपासात या बाबी समोर आल्या आहेत. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे. भाजपला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली आठ टक्के मते हवी आहेत. म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत.

कितीही टीका केली तरी आमचे सरकार पाच वर्षे काम करणारभाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सायकल म्हणून टीका केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपा नेत्यांच्या या टीकेला आता वर्ष होत आले आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

दसरा मेळावा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होणारशिवसेनेचा मुंबईत होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होईल किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होईल, याचा निर्णय येत्या काही दिवसात होईल, असे आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. हा मेळावा कशा पद्धतीने होईल, हे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे सत्ताराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्षभरापूर्वी सातारा येथे भरपावसात जाहीर सभा झाली होती. वयाने ज्येष्ठ असल्याने नेत्याने अशा पद्धतीने सभा घेतल्याने त्यावेळी जनतेची सहानुभूती देखील मिळाली होती. ही सभा अविस्मरणीय होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील अशाच पद्धतीने सभा झाली होती, अशी आठवण सांगत गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रयत्नानेच आजची ही सत्ता असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाJalgaonजळगावPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार