शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुन्हा राजकीय भूकंप? राजस्थानमध्ये मित्रपक्षाने गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 15:15 IST

Rajasthan Politics: पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने मित्रपक्ष नाराज झाला आहे.

राजस्थानमध्ये माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या सचिन पायलट यांनी बंडखोरी करत काँग्रेसचे गेहलोत सरकार (Ashok Gehlot Government) उलथविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सत्तास्थापनेपासून सत्ता टिकविण्यापर्यंत मित्र पक्षांनी साथ दिली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे हे मित्रपक्ष गेहलोत सरकारला सोडचिठ्ठी देऊ लागल्याचे चित्र आहे. 

पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) ने काँग्रेस सरकारला दिलेले समर्थन मागे घेतले आहे. बीटीपीच्या दोन आमदारांनी गहलोत सरकारला समर्थन दिले होते.बीटीपीचे दोन आमदार राजकुमार रोत आणि रामप्रसाद यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि गुजरातचे आमदार महेश वसावा यांच्याकडे काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी केली होती. यावर हिरवा कंदील येताच त्यांनी पाठिंबा काढल्याचे स्पष्ट केले आहे. सत्तास्थापनेपासून सत्तासंघर्ष काळात आणि राज्यसभा निव़डणुकीतही दोघांनी काँग्रेसचे उमेदवार के सी वेनुगोपाल आणि नीरज डांगी यांना मतदान केले होते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीने त्यांना काँग्रेसशी संबंध तोडण्यास भाग पाडले आहे. 

राजस्थानच्या आदिवासी भागातील डूंगरपुरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बीटीपीला ( Bharatiya Tribal Party) सर्वाधिक मते मिळाली होती. मात्र, काँग्रेस आणि भाजपाने हातमिळवणी करत बीटीपीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविण्यापासून रोखले. इथे भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आला आहे. यामुळे बीटीपी नाराज झाली आहे.

 गेहलोत सरकार संकटात? सचिन पायलट यांच्या बंडाची हवा काढणाऱ्या काँग्रेसला बीटीपी गेल्याने फारसे नुकसान होणार नाही. आताही काँग्रेसकडे मोठे बहुमत आहे. मात्र, काही जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. राजस्थानमध्ये एकूण २०० विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी गहलोत सरकारकजे ११८ आमदार आहेत. यात काही अपक्ष आमदारही आहेत. 

भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागापंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. या निवडणुकीसोबत जिल्हा परिषदेच्या ६३६ जागांसाठीही निवडणूक झाली. सत्ताधारी काँग्रेसने १० तर भाजपने ३ जागा जिंकल्या. मतमोजणी अजूनही सुरू आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. जिल्हा परिषदेच्या १,७७८ उमेदवारांचे व पंचायत समित्यांतील १२ हजार ६६३ उमेदवारांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे. मतदान २३ व २७ नोव्हेंबर व एक व पाच डिसेंबर रोजी झाले. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानElectionनिवडणूकBJPभाजपा