शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

TMC लोकसभेत 'हाफ', यावेळी पूर्णच होणार 'साफ'; पंतप्रधानांचा तृणमूल काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 15:58 IST

PM Narendra Modi : सर्वांच्या विकासासाठी २४ तास मेहनत करू, पंतप्रधानांचं आश्वासन

ठळक मुद्देविकासासाठी २४ तास मेहनत करू, पंतप्रधानांचं आश्वासनममता बॅनर्जींनी जनतेचा विश्वास तोडला, पंतप्रधानांचं वक्तव्य

येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आता भाजपनंही पूर्णपणे जोर लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात भारत माता की जय या घोषणेनं केली. "बंगालच्या पवित्र भूमीला मी नमन करतो. बंगालच्या या भूमीनं आमच्या संस्कारांना ऊर्जा दिली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यानही बंगालनं प्राण फुंकले होते. परंतु आता ममता बॅनर्जी यांनी बंगालला धोका दिला आहे," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल करत लोकसभेत तृणमूल काँग्रेस अर्धी झाली, यावेळी ती पूर्णच साफ होणार असल्याचं म्हटलं."पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन आणण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांनी ममता बॅनर्जींवर भरवसा केला होता. परंतु त्यांनी हा भरवसा तोडला आहे. या लोकांनी बंगालचा अपमान केला आहे. या ठिकाणच्या मता-भगिनींवर अत्याचार केला आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे टीएमसी आहे, लेफ्ट-काँग्रेस आणि आहे आणि त्यांची बंगाल विरोधी वृत्ती आहे. तर दुसरीकडे स्वत: बंगालची जनता कंबर कसून उभी आहे. आज तुम्हा लोकांकडे पाहून कोणाच्याही मनात कोणतीही शंका येणार नाही. काही लोकांना तर आज २ मे आहे असंच वाटत असेल," असं मोदी म्हणाले. 

विकासासाठी २४ तास मेहनत करू"मी या ठिकाणी परिवर्तानाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालच्या विकासाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालमध्ये बदल घडवण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माणाचा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी तरूण, शेतकरी, उद्योजक, माता-भगिनी यांच्या विकासासाठी आम्ही २४ तास दिवसरात्र मेहनतीनं काम करु. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही." असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.... तर शत्रू बनवलं असतंआपल्या संबोधनादरम्यान मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही केवळ बंगालच्याच नाही तर भारताच्याही सुपुत्री आहात. काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही स्कूटी सांभाळली, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाव्या अशी सर्वजण प्रार्थना करत होते. चांगलं झालं तुम्ही पडल्या नाहीत. नाहीतर ज्या राज्यात ती स्कूटी तयार झाली होती त्याच राज्याला आपला शत्रू बनवलं असतं," असं मोदी म्हणाले.राहुल गांधींवरही निशाणायावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. आजकाल आमचे विरोधक म्हणताता की मी मित्रांसाठी काम करतो. आपण सर्वच जाणतो की ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो, ज्या ठिकाणी खेळलो, ज्यांसोबत शिकलो ते आपल्या आयुष्यभराचे मित्र होतात. मी गरीबांमध्ये लहानाचा मोठा झालो आणि त्यामुळेच त्यांचं दु:ख काय आहे हे समजतो. यासाठीच मी मित्रांसाठी काम करतो आणि त्यांच्यासाठी काम करतच राहणार असल्याचंही त्यांनी सष्ट केलं.

 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीMithun Chakrabortyमिथुन चक्रवर्ती