पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 10:10 AM2021-04-01T10:10:30+5:302021-04-01T10:11:55+5:30

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

PM Narendra Modi special phone call to CM Uddhav Thackeray; Asked about Rashmi Thackeray's health | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

Next
ठळक मुद्देकोरोनाची लागण झाल्यानं रश्मी ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेंनी कोरोना लस घेतली होती.

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना(Rashmi Thakceray) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचसोबत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.(PM Narendra Modi Called CM Uddhav Thackeray for Asking Rashmi Thackeray health Updates)

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुंबईतील गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर रश्मी ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. गेले आठ दिवस त्यांना खोकला येत होता. त्यामुळे त्यांना मंगळवारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.  

रश्मी ठाकरे यांनी ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोरोनाची लस घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांना कोरोनाचा संर्ग झाला होता. सुरुवातीला वर्षा निवासस्थानी क्वारेंटाइन राहिल्यानंतर रश्मी ठाकरे यांना अधिक उपचारांसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी राज्यात ३९ हजार ५५४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली असून, तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिवसभरात २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्राण ८५.३४ टक्क्यांवर गेले असून, मृत्युदर १.९४ टक्के असल्याची नोंद आहे.

Read in English

Web Title: PM Narendra Modi special phone call to CM Uddhav Thackeray; Asked about Rashmi Thackeray's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.