शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सलग ५० वर्षांपासून आहेत आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे मोदींनी केले खास अभिनंदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 22:45 IST

PM Narendra Modi congratulates Pratapsingh Rane : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी आमदार म्हणून गोव्याच्या विधिमंडळात ५० वर्षे पूर्ण केली आहेत.

पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी आमदार म्हणून गोव्याच्या विधिमंडळात ५० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही प्रतापसिंह राणे यांना आज शुभेच्छा दिल्या. तसेच गोव्याच्या प्रगतीसाठीचा त्यांचा उत्साह त्यांच्या कार्यामधून दिसून येतो, अशा शब्दात प्रतापसिंह राणेंचा गौरव केला. गोव्याच्या विधानसभेनेही प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा दिल्या. त्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडून एक प्रस्ताव मांडण्यात आला. (PM Narendra Modi congratulates Goa congress leader Pratapsingh Rane for completing 50 years as MLA)

प्रतापसिंह राणे यांना शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, प्रतापसिंह राणेजी आमदार म्हणून ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जनतेची सेवा आणि गोव्याच्या प्रगतीसाठी प्रतापसिंह राणे यांचा उत्साह त्यांच्या कार्यामधून दिसून येतो. मला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असताना केलेल्या चर्चा अजूनही आठवणीत आहेत. 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ट्विट करून प्रतापसिंह राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सावंत यांनी ट्विट करताना लिहिले की, आमदाराच्या रूपात ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक कार्य आणि राजकारणामध्ये त्यांचा दीर्घ अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची भावी वाटचाल आणि आरोग्यासाठी शुभेच्छा, असे प्रमोद सावंत म्हणाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgoaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण