शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Phone tapping : "रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत घेतले दोन अनिल आणि एका बड्या नेत्याचे नाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 13:47 IST

Phone tapping case : रश्मी शुक्ला यांनी सीबीआयसमोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले असल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. 

ठळक मुद्देभाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत एक सनसनाटी ट्विट करून उडवली खळबळ रश्मी शुक्ला यांनी दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे घेतले नाव राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला

मुंबई - गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान, या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल सादर केला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र रश्मी शुक्ला ह्या कोरोनाचे कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र त्यांनी सीबीआयसमोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले असल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.   (Rashmi Shukla names two Anil and one big leader in CBI probe, Claim of BJP MLA Atul Bhatkhalkar)

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत एक सनसनाटी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. या ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले की, आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या सीबीआय चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.  

 उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ ठेवण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ, त्यानंतर या स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांची झालेली हत्या, या दोन्ही प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा आढळलेला सहभाग, मग परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि नंतर बदल्यांच्या रॅकेटबाबतच्या संभाषणाचा ६.१ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. त्या प्रकरणात शुक्ला यांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील मंत्र्यांकडून करण्यात आला होता. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात सीताराम कुंटे यांनी दिलेल्या अहवालात नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्यावर काही जणांचे पोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी घेतली होती असे म्हटले होते. त्यानंतर फोन टॅपिंगची कागदपत्रे उघड केल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग