शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल नक्कीच 100 रुपये गाठेल, लसीकरणाचा खर्च केंद्रानेच करावा; अजित पवारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 17:15 IST

Ajit pawar News : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबरची किंमत प्रचंड वाढलेली आहे. या सर्व वस्तुंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढलेली आहे. याचसोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोना महामारीत गेला. त्यामुळे विकास दर घटला आहे. अनेक कामांना कात्री लावावी लागली. अधिवेशनाचा कालावधी देखील कमी करावा लागला. आता कोरोना हळू हळू कमी होतोय. पुण्यात काल एक ही मृत्यू नाही. अद्यापही केंद्राकडून राज्याच्या जीएसटीचे 35 हजार कोटी रुपये आलेले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. माझ्या आधी मुख्यमंत्री येऊन गेले. प्राणी संग्रहालयाच्या कार्यक्रमात आले होते. गेल्या वर्षी पाऊस चांगला असल्याने धरणाची स्थिती समाधानकारक आहे. जीएसटीवर आता केंद्राची स्थिती सुधारत आहे. दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते ते येत नाहीयेत. कोरोना काळात आर्थिक स्थिती कमकुवत झाली असताना काही महत्वाच्या विभागांना आम्ही निधी कमी केला नाही. जिल्हा विकास निधीला कात्री लावली नाही, असेही पवार म्हणाले. (Ajit Pawar Speak on corona pandemic, inflation)

रियल इस्टेट क्षेत्रात आम्ही मुद्रांक शुल्क कमी केले. त्याला डिसेंबरपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. जानेवारीपासून तेवढी खरेदी नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबरची किंमत प्रचंड वाढलेली आहे. या सर्व वस्तुंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढलेली आहे. याचसोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. काही काळात पेट्रोल नक्कीच 100 रुपये गाठेल, अशी भविष्यवाणीदेखील अजित पवारांनी केली. तसेच कोरोना लसीकरणाचा खर्च राज्यांवर न ढकलता तो केंद्र सरकारनेच करावा अशी मागणीही केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPetrolपेट्रोलGSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस