शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

केरळमधील काँग्रेसचा माजी शिलेदार शरद पवारांच्या भेटीला; थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:23 IST

Kerala Assembly Election 2021: केरळमध्ये लोकशाही पद्धतीने उमेदवारांची निवड झाली नसल्याचा आरोप पीसी चाको यांनी काँग्रेसवर केला होता. यानंतर त्यांनी 10 मार्चला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात शरद पवार आणि पीसी चाको एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत.

केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पीसी चाको यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. आज ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असून सायंकालपर्यंत एकत्र पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. चाको हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ( A week after Senior leader PC Chacko resigned from Congress, it is likely that he will join the Nationalist Congress Party (NCP), according to reports.)

पीसी चाको यांनी सांगितले की, मी थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटणार आहे. मी जो काही काँग्रेस पक्षात संघर्ष केला तो त्यांना सांगणार आहे. याचबरोबर मी सीताराम येच्युरी आणि गुलाब नबी आझाद यांच्याशीही बोलून पुढील दिशा ठरविणार आहे. मी केरळ निवडणुकीमध्ये एलडीएफला पाठिंबा जाहीर करणार आहे. तसेच शरद पवारांशी बोलल्यानंतर राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेणार आहे. 

आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार

केरळमध्ये दोन आघाड्या आहेत. एक काँग्रेसप्रणित आणि दुसरी डाव्यांची. मी आता काँग्रेस सोडल्याने माझे निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे. मी एलडीएफला उघडपणे पाठिंबा देऊ शकतो, असे चाको यांनी सांगितले. 

केरळमध्ये लोकशाही पद्धतीने उमेदवारांची निवड झाली नसल्याचा आरोप चाको यांनी काँग्रेसवर केला होता. यानंतर त्यांनी 10 मार्चला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. केरळ काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. उमेदवारांबाबत या दोन गटांनाच माहिती होती. आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. केरळमध्ये लोकांना काँग्रेस पुन्हा सत्तेत हवी आहे, मात्र गटबाजीमुळे आणि चुकीचे उमेदवार दिल्याने ते होणार नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. चाको हे थ्रिसुर लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये खासदार झाले होते.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१