शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहेत का?'; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 10:49 IST

Bhagwat Karad Janashirwad Yatra: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज परळीतून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली.

परळी: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात परळीमधून होत आहे. दरम्यान, ही यात्रा सुरु होण्यापूर्वीच परळीत गोंधळ झालेला पाहायला मिळाला. प्रितम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यामुळे आधीच नाराज असलेल्या मुंडे समर्थकांनी भागवत कराड परळीत दाखल घोषणाबाजी सुरू केली. या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या. 

आज सकाळी भागवत कराड पंकजा मुंडेंच्या परळी येथील घरी दाखल झाले. यावेळी पंकजा यांच्या घराबाहेर मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है...', अशा स्वरुपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. यानंतर भागवत कराड यांच्यासमोरच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहे का? इथे काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का? हे वागणं मला चालणार नाही, असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, अशा शब्दात पंकजा यांनी कार्यकर्त्यांना झापलं.

पुन्हा समोर आली कार्यकर्त्यंची नाराजी  ?

काही दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा असतानाही त्यांना डावलून डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. तेव्हा मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी उमटली होती. ही नाराजी वाढून भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामाे दिले होते. पण, पंकजा मुंडेंनी मुंबईत या नाराज समर्थकांना बोलावून त्यांची समजूत काढत राजीनामे अमान्य केले होते. आता परत आजच्या घटनेमुळे समर्थकांची नाराजी पुन्हा समोर आली आहे. 

16 ते 21 ऑगस्टदरम्यान जनआशीर्वाद यात्राकेंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी ट्विटरवरुन जनआशीर्वाद यात्रेची घोषणा केली. 'मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला. भव्य जनआशिर्वाद यात्रा-दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021', असं ट्विट करुन भागवत कराड यांनी या जनआशीर्वाद यात्रेची माहिती दिली. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBhagwat Karadडॉ. भागवतBJPभाजपाparli-acपरळी