शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा; महाविकास आघाडीत ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 16:50 IST

Pandharpur Assembly By Election shiv sena leader files nomination: पंढरपुरात शिवसेनेची बंडखोरी; महिला जिल्हा प्रमुख निवडणुकीच्या रिंगणात 

सोलापूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत अपेक्षित होती. मात्र इथे महाविकास आघाडीमध्येच फूट पडल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैला गोडसेंनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. (Pandharpur Assembly By Election shiv sena leader files nomination)आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित होती. पण महाविकास आघाडीतला घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बंडखोरी केली. त्यापाठोपाठ आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनीसुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच : नितीन नागणेराष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट?पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी शिंदेंचा पराभव केला होता.भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीनेदेखी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. उमेदवार निवडीसाठी काही दिवसांपूर्वीच पंढरपूरमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक बैठक घेतली. यानंतर दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थ यांच्या नावाची चर्चा झाल्याचं समजतं.

टॅग्स :PandharpurपंढरपूरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस