...अन्यथा राजकारणातून निवृत्त होऊ म्हणणारे नाना पटोले अधिकच सक्रीय झाले; फडणवीसांविरुद्ध उभे राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:25 AM2021-07-25T08:25:20+5:302021-07-25T08:26:28+5:30

गडकरींकडून हरलेले पटोले फडणवीसांविरोधात लढणार, महापालिका निवडणूक आढावा बैठकीत सूतोवाच

... Otherwise, Nana Patole, who wanted to retire from politics, became more active; Will stand against Fadnavis? | ...अन्यथा राजकारणातून निवृत्त होऊ म्हणणारे नाना पटोले अधिकच सक्रीय झाले; फडणवीसांविरुद्ध उभे राहणार?

...अन्यथा राजकारणातून निवृत्त होऊ म्हणणारे नाना पटोले अधिकच सक्रीय झाले; फडणवीसांविरुद्ध उभे राहणार?

Next
ठळक मुद्देनागपूर महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी नाना पटोले यांनी कंबर कसली आहेपटोले यांनी शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वेगवेगळी बैठक घेऊन आढावा घेतला.गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभेची निवडणूक लढली होती.

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. शनिवारी महापालिका निवडणूक तयारीसाठी आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पटोले यांनी तसे सूतोवाच केले. गेल्या वेळी लोकसभेत नितीन गडकरी यांनी त्यांचा पराभव केला, हे उल्लेखनीय.

नागपूर महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी नाना पटोले यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पटोले यांनी शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वेगवेगळी बैठक घेऊन आढावा घेतला. या मोहिमेची सुरुवात त्यांनी फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघापासून केली. बैठकीत पटोले यांनी पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढेन, असे वक्तव्य केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी गडकरी यांना लाखाच्या फरकाने पराभूत करू अन्यथा राजकारणातून निवृत्त होऊ, अशी घोषणा पटोले यांनी केली होती. परंतु, पटोले मोठ्या फरकाने पराभूत झाले व राजकारणातून निवृत्त होण्याऐवजी अधिक सक्रिय झाले. साकोलीतून विधानसभेची निवडणूक जिंकत विधानसभेचे अध्यक्ष व पुढे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही झाले.

Web Title: ... Otherwise, Nana Patole, who wanted to retire from politics, became more active; Will stand against Fadnavis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app