शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

By प्रविण मरगळे | Updated: November 23, 2020 15:23 IST

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेतमेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेतृत्वाबद्दल पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीला नेतृत्वाला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षात गांधी कुटुंबाचं वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भाजपा तामिळनाडू आणि बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे, तर आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत लढत आहेत. हे तेच नेते आहेत,ज्यांनी इतकी वर्ष काँग्रेस कार्यकारणी समितीवर कब्जा ठेवला आहे. काही चांगले झाले तर त्याचा उपभोग घ्यायचा आणि खराब झालं तर त्याच्यावर टीका करायची. ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्त्वावर ढासळत असलेला विश्वास काँग्रेसला कमकुवत करत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व कंबर कसून तयार होत नाही, तोपर्यंत खालच्या स्तरात कमकुवत शक्ती आणि कोंडी कायम राहणार आहे. यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत, मेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, चमत्कार नक्कीच घडेल असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. यामुळेच देशाचे भले झाले असून पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

गुलाब नबी आझादांची टीका

नेते जोवर पंचतारांकित संस्कृतीचा त्याग करत नाहीत तोवर पक्ष विजयी होणे शक्य नाही. काँग्रेसच्या प्रत्येक स्तरावरील कार्यशैलीत बदल झाला तरच हा पक्ष अधिक मजबूत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात तसेच संघटनेत बदल करावेत अशी मागणी आझाद यांच्यासह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर आझाद यांना सप्टेंबरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटविले होते. आझाद यांनी सांगितले की, गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्याची अवस्था सर्वात केविलवाणी आहे. लोकसभेच्या गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. असे असूनही लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकांत काँग्रेसने ९ जागा जिंकल्या. हे अनपेक्षित यश होते.

 कपिल सिब्बलही नाराज

राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या असं सांगत कपिल सिब्बल यांनीही नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपमkapil sibalकपिल सिब्बलElectionनिवडणूक