शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"अजून एका मंत्र्याचा पर्दाफाश करणार, पुढच्या आठवड्यात तिसरा राजीनामा होणार’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 12:05 IST

Chandrakant Patil News : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुणे - गेल्या सव्वा महिन्याच्या काळात राज्य सरकारमधील संजय राठोड (Sanjay Rathod) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) या दोन बड्या नेत्यांना गंभीर आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) चांगलेच अडचणीत सापडले आहे. सरकारमधील दोन मोठ्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विरोधा पक्ष असलेला भाजपा (BJP) आता कमालीचा आक्रमक झाला आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ("One more minister will be exposed, a third will resign next week", Chandrakant Patil Claim)चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल. मात्र हा मंत्री कोण हे मात्र सांगणे चंद्रकांत पाटील यांनी टाळले. तसेच तो मंत्री कोण हे तुम्ही शोधून काढा असा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला. तसेच हा मंत्री कुठल्या पक्षाचा आहे असे विचारला असता तो मंत्री कुठल्या पक्षाचा आहे हे आपल्याला ठावून नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देणे टाळले. त्यामुळे त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान,  राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण