शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

अपशकुनी वॉर्ड; गृहमंंत्री अमित शहांना का वाटतेय एम्सच्या तळमजल्यावरील VVIP कक्षाची भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 1:39 AM

पूर्ण बरे झाल्यावर अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले; पण प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्याच दिवशी रात्री २ वाजता अमित शहा यांना पुन्हा त्रास होऊ लागला.

हरीश गुप्ता, राष्ट्रीय संपादक, लोकमतकोविड-१९ साथीची लागण झाल्यावर गृहमंत्री अमित शहा मेदान्त इस्पितळात का दाखल झाले, याचा किस्साही मजेशीर आहे. खरे तर दिल्लीतील अ.भा. आयुर्विज्ञान संस्था (एम्स) अगदी जवळ होती व तेथे अत्याधुनिक असा स्वतंत्र व्हीव्हीआयपी वॉर्डही आहे. तरीही तेथे न जाता शहा गुरुग्रामपर्यंत मोटारीने गेले. शहा मेदान्तमध्ये गेल्यावर ते तेथे का गेले याचा मागोवा घेण्यासाठी ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरियाही लगोलग तेथे पोहोचले. त्यांना शहा यांच्याकडून असे कळविण्यात आले की, गृहमंत्र्यांची ‘एम्स’बद्दल काहीच तक्रार नाही; पण तेथील व्हीव्हीआयपी वॉर्ड तळमजल्यावर असल्याने तेथे दाखल होणे त्यांनी नापसंत केले. तसेच मेदान्तमध्ये असले तरी ‘एम्स’ डॉक्टरांच्याच देखरेखीखाली ते येथेही असतील; पण डॉ. गुलेरिया यांचे या सांगण्याने समाधान झाले नाही.

अमित शहा बरे झाल्यावर डॉ. गुलेरिया यांनी त्यांना सांगितले की, ‘एम्स’मध्ये पाचव्या मजल्यावर एक जुना व्हीव्हीआयपी वॉर्डही आहे. इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर आता तळमजल्यावर असलेला नवा व्हीव्हीआयपी वॉर्ड खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यासाठी तयार केला गेला. पूर्ण बरे झाल्यावर अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले; पण प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्याच दिवशी रात्री २ वाजता अमित शहा यांना पुन्हा त्रास होऊ लागला. या वेळी मात्र त्यांनी मेदान्तमध्ये न जाता ते ‘एम्स’च्या पाचव्या मजल्यावरील खासगी व्हीव्हीआयपी वॉर्डात दाखल झाले

पण ‘भिंतीला कान’ लावले असता जे समजले ते कारण असे की, अलीकडेच ‘एम्स’च्या तळमजल्यावरील व्हीव्हीआयपी वॉर्डात झालेल्या मृत्यूंमुळे अमित शहा त्या वॉर्डाला अपशकुनी मानतात. त्यांच्या समर्थकांच्या मते तो वॉर्ड वास्तुशास्त्रानुसारही अयोग्य ठिकाणी आहे. ते काहीही असो, अमित शहा नंतरच्या वेळेला या तळमजल्यावरील वॉर्डऐवजी पाचव्या मजल्यावरील वॉर्डमध्ये दाखल झाले हे मात्र पुरेसे बोलके आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाAIIMS hospitalएम्स रुग्णालय