ऑलिम्पियन नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:25 PM2021-08-09T12:25:36+5:302021-08-09T12:29:15+5:30

Rahul Gandhi slams Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक खेळाडूंना व्हिडिओ कॉलवरुन शुभेच्छा दिल्या होत्या.

From the old tweet of Olympian Neeraj Chopra, Rahul Gandhi targeted the Prime Minister, said ... | ऑलिम्पियन नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाले...

ऑलिम्पियन नीरज चोप्राच्या जुन्या ट्विटवरुन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाले...

Next

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा(Neraj Chopra)च्या काही जुन्या ट्विट्सवरुन नरेंद्र मोदी(Nrendra Modi) सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. 'खेळाडूंनी शुभेच्छासह त्यांचा हक्कही मिळायला हवा. फक्त खेळाचे बजेट कमी करुन चालणार नाही. आता व्हिडिओ कॉल बस्स, जिंकलेली रक्कम द्या...' असा टीका राहुल गांधींनी मोदींवर केली. 

राहुल गांधींनी नीरज चोप्राचे जुने ट्विट्स शेअर केले आहेत. त्यात नीरज म्हणतो की, ''तुम्ही जी रक्कम देण्याची विनंती केली होती, ती आम्हाला द्यावी. म्हणजे आम्ही आमचे पूर्ण लक्ष्य येणाऱ्या ऑलिम्पिक खेळावर करू शकू." तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये नीरज म्हणतो की, ''सर जेव्हा आम्ही पदक जिंकून येतो, तेव्हा तुम्ही आणि संपूर्ण देश आमच्यावर गर्व करता. हरियाणातील खेळाडूने जगभर नाव काढलं, असं म्हणता.  दुसरे राज्यही हरियाणाच्या खेळाडूंचे उदाहरण देतात.''

हे दोन्ही ट्विट वाचून तुम्हालाही अंदाज आला असेल की, ऑलिम्पिकपूर्वी नीरज कुठल्या अडचणीतून जात होता. राहुल गांधी यांनी यावरुनच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पीएम मोदींनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना व्हिडिओ कॉलवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणतात की, व्हिडिओ कॉल बस झाला, आाता विजयाची रक्कम द्या. 

Web Title: From the old tweet of Olympian Neeraj Chopra, Rahul Gandhi targeted the Prime Minister, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.