शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

तो असं करू शकत नाही; गंभीरच्या पाठीशी हरभजन, लक्ष्मण खंबीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 15:02 IST

आप उमेदवाराबद्दल अपमानास्पद मजकूर असलेली पत्रकं वाटल्याचा आरोप

नवी दिल्ली: पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी आपच्या उमेदवार आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं असताना गंभीरचे दोन माजी सहकारी त्याच्या मदतीसाठी धावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंह यांनी गंभीरसाठी बॅटिंग केली आहे. गौतम गंभीर महिलांविरोधात चुकीचं बोलणार नाही, असा विश्वास हरभजन सिंगनं व्यक्त केला. 'मी काल (गुरुवारी) गौतम गंभीरशी संबंधित एक प्रकरण ऐकलं. ते ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला खूप चांगलं ओळखतो. तो कधीही महिलांविरोधात चुकीचं बोलणार नाही. तो निवडणुकीत जिंको अथवा पराभूत होवो, माणूस म्हणून तो खूप चांगला आहे,' असं ट्विट करुन हरभजननं गंभीरची बाजू घेतली आहे.माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनंदेखील ट्विट करुन गौतम गंभीरवरील आरोपांवर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं. 'काल (गुरुवारी) ऐकलेल्या गोष्टी ऐकून मी स्तब्धच झालो. गौतमला मी 2 दशकांपासून ओळखतो. त्याच्या मनात महिलांबद्दल आदर आहे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी खात्री देऊ शकतो,' असं लक्ष्मणनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघात आपच्या आतिशी मार्लेना आणि भाजपाचे गौतम गंभीर अशी लढत आहे. मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात आली. यामागे भाजपा आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रकं वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019east-delhi-pcपूर्व दिल्लीGautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाAAPआपHarbhajan Singhहरभजन सिंग