शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

आता जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल, चंद्रकांत पाटील यांचा नितीन राऊत यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:37 IST

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.

मुंबई - राज्यातील वाढलेल्या वीजबिलांच्या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.राज्यातील वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, " वीजबिलं वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झालाय." असे राज्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली. हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरले आहे.महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे वसई विरार क्षेत्राचे आमदार आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपये विजेचे बिल आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे. तसेच वसई विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले आहे की कोणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका, ऊर्जामंत्र्यानी हे वाचले नाही का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.नागपूरमध्ये एका व्यक्तीने 40 हजार रुपये विजेचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने आत्महत्या केली. ही संपूर्ण शासन आणि प्रशासनासाठी लज्जास्पद आणि खेदजनक घटना होती . त्यांच्या कुटुंबाने विजेचे बिल कमी करण्याची विनंती देखील केली होती परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे मंत्री महोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना 'शॉक' देणं बंद करा. जनतेने मोदींवर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल. जनता सर्व काही बघतेय हे लक्षात ठेवा.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNitin Rautनितीन राऊतmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपाelectricityवीज