पत्नी ऐकत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्याने वृतपत्रातून दिली नोटिस, आता पत्नीनं दिलं असं प्रत्युत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:28 PM2021-07-14T21:28:07+5:302021-07-14T21:28:07+5:30

Congress leader Bharat Singh Solanki: गुजरात काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या भरत सिंह सोळंकी यांनी मंगळवारी वृत्तपत्रामध्ये एक पब्लिक नोटिस प्रसिद्ध केली होती.

Notice given by a Congress leader Bharat Singh Solanki in a newspaper saying that his wife is not listening, now the reply given by his wife ... | पत्नी ऐकत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्याने वृतपत्रातून दिली नोटिस, आता पत्नीनं दिलं असं प्रत्युत्तर...

पत्नी ऐकत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्याने वृतपत्रातून दिली नोटिस, आता पत्नीनं दिलं असं प्रत्युत्तर...

Next

अहमदाबाद - काँग्रेच्या एका बड्या नेत्याच्या कुटुंबातील अंतर्गत विषय सध्या चव्हाट्यावर आला आहे. गुजरातकाँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या भरत सिंह सोळंकी यांनी मंगळवारी वृत्तपत्रामध्ये एक पब्लिक नोटिस प्रसिद्ध करत त्यांची पत्नी गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नसल्याची माहिती दिली होती. तसेच कुणीही आपल्या नावाने आपल्या पत्नीशी पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार करू नये, असेही सांगितले होते. आता भरत सिंह सोळंकींची पत्नी रेश्मा यांनीही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या पतीच्या नोटिशीला वृत्तपत्रातील नोटिशीमधूनच उत्तर दिले आहे. आपल्यावर घटस्फोटासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप रेश्मा यांनी केला आहे. (Notice given by a Congress leader Bharat Singh Solanki in a newspaper saying that his wife is not listening, now the reply given by his wife)

मंगळवारी भरत सिंह सोळंकी यांनी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत म्हटले होते की, माझी पत्नी रेश्मा पटेल ही गेल्या चार वर्षांपासून माझ्यासोबत राहत नाही. तसेच ती माझे म्हणणेही ऐकत नाही. त्यामुळे माझ्या पत्नीशी माझे नाव घेऊन कुठल्याही प्रकारचा पैशांच्या देवाण घेवाणीचा व्यवहार करू नये. तसेच जर असा व्यवहार कुणी केला तर त्यासाठी भरत सिंह सोळंकी जाबाबदार नसतील.

आता पती भरत सिंह सोळंकी यांच्या या नोटिशीला पत्नी रेश्मा यांनी वकिल निखिल जोशी यांच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यांनीही वृत्तपत्रात जाहिरात देत रेश्मावर घटस्फोटासाठी दबाव आणला जात आहे. तसेच रेश्मावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे.

रेश्माच्या वकिलांनी नोटिशीमध्ये लिहिले की, जेव्हा भरत सिंह सोळंकी यांना कोरोना झाला होता. तेव्हा रेश्मा यांनीच त्यांची सेवा केली होती. एकप्रकारे त्यांना पुनर्जन्मच दिला होता. मात्र आजारातून सावरल्यापासून भरत सिंह सोळंकी यांची वागणूक बदलली. ते रेश्मा यांना शिव्या द्यायला लागले. त्यांनी रेश्मा यांना घरातून बाहेर काढले. तसेच राजकीय वजनाचा फायदा घेऊन ते आता रेश्मा यांना घटस्फोट देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी रेश्मावर खूप दबाव आणला जात आहे.

या नोटिशीत रेश्माचे वकील लिहितात की, त्यांची अशील असलेल्या रेश्मा सोलंकी यांनी त्यांचेय पती भरत सिंह सोळंकी यांच्यासोबत कुठलेही चुकीचे वर्तन केलेले नाही. मात्र तरीही भरत सिंह सोळंकी यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिकदृष्ट्या छळले जात आहे. तसेच घटस्फोटासाठी त्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, असा आरोप वकिलांनी केला.  

Web Title: Notice given by a Congress leader Bharat Singh Solanki in a newspaper saying that his wife is not listening, now the reply given by his wife ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.