शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नुसतं अयोध्येत जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 21:01 IST

Nawab Malik : नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

ठळक मुद्देराज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले. 

शुक्रवारी नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी त्यांना विचारण्यात आले असता, प्रत्येकाला आपापली आस्था जपण्याचा अधिकार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवे, त्याठिकाणी जाऊ शकतात, असे नवाब मलिक म्हणाले.

याचबरोबर, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. याविषयी भाष्य करताना नवाब मलिक यांनी कोणी कोणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

मी स्वतः अयोध्येला जाणार - देवेंद्र फडणवीसराज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी; म्हणाले...)

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले... "राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू", असं संजय राऊत म्हणाले

राज्यात भाजपा- मनसे युती ? राज्यात भाजपाशी फारकत घेतल्यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीकाही वेळोवेळी होत आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत मनसेने हिंदुत्वाकडे वाटेने मार्गक्रमण सुरु केले आहे. त्याचवेळी भाजपा आणि मनसेची एकत्र येण्याच्या चर्चांना देखील मोठे उधाण आहे . 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊत