शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: December 28, 2020 08:54 IST

शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांची जोरदार बॅटिंग

मुंबई: काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी करावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात राऊत यांनी दोनदा त्यांच्या लेखांमधून पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावरून काँग्रेसनं नाराजीदेखील व्यक्त केली.एका बाजूला संजय राऊत यांच्याकडून जोरदार बॅटिंग सुरू असताना आता खुद्द शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. 'यूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,' असं पवार म्हणाले. ते 'न्यूज१८ इंडिया' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.ही विरोधी पक्षाचीच दुर्दशा, संजय राऊतांचा काँग्रेसवर बाण; राज्यात पडसाद उमटणार? शनिवारी 'सामना'च्या अग्रलेखातून यूपीएच्या अवस्थेवर भाष्य करण्यात आलं. यूपीएचं नेतृत्त्व कमकुवत झालं आहे. सत्ताधाऱ्यांना तोंड देताना विरोधी पक्षांमध्ये एकजूट दिसत नाही. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए एक राजकीय आघाडी आहे. मात्र आता तिची अवस्था एका एनजीओसारखी झाली आहे. काँग्रेसला वर्षभराहून अधिक काळ पूर्ण अध्यक्ष नाही, अशा शब्दांत राऊत यांनी अग्रलेखातून काँग्रेसच्या अवस्थेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.काँग्रेसवर टीका करताना राऊत यांनी शरद पवारांचं मात्र कौतुक केलं. 'राष्ट्रवादी काँग्रेसचा अपवाद वगळता यूपीएमधील अन्य सहकारी पक्षांमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. काँग्रेसचं नेतृत्त्व कोण करणार? यूपीएचं भविष्य काय? असे प्रश्न कायम आहेत,' असं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं. राहुल गांधी संघर्ष करणारे नेते आहेत. पण त्यांना आवश्यक असलेली साथ मिळत नाही, असंदेखील राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी