शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अजितदादा, जयंतराव नाही तर गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्याचे नाव आघाडीवर, शरद पवारांचीही नावाला पसंती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 16:15 IST

post of Home Minister of Maharashtra : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावे गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मात्र या दोन नेत्यांऐवजी तिसऱ्याच नेत्याच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे. 

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणामुळे राष्ट्रवादीत काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावे गृहमंत्रिपदासाठी आघाडीवरमात्र कोरोना काळात राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या राजेश टोपेंकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा शरद पवार यांचा विचार

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवसस्थानासमोर सापडलेली स्फोटके आणि नंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची गोची झालेली आहे. त्यात गृहमंत्रालय राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठत आहेत. या सर्व घटनाक्रमामुळे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीत काँग्रेसचे प्रमुख  शरद पवार (Sharad Pawar) हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे वृत्त येत आहे. तसेच अनिल देशमुख यांना हटवण्यात येणार असल्याचीही चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची नावे गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मात्र या दोन नेत्यांऐवजी तिसऱ्याच नेत्याच्या नावाला पसंती असल्याची चर्चा आहे.  (Not Ajit Pawar, No Jayantr Patil, but the name of Rajesh Tope is in the forefront for the post of Home Minister of Maharashtra, Sharad Pawar also green Signal to Topes Name )

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातकेलेल्या खळबळजनक दाव्यानंतर  या प्रकरणावरून मोठमोठे गौप्यस्फोट होऊ लागले होते. त्यादरम्यान, सचिन वाझेंना झालेली अटक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हटवावे लागल्याने राज्य सरकारवर नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी अजित पवार किंवा जयंत पाटील या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांपैकी एकाकडे गृहमंत्रालयाचा कारभार जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गृहमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याऐवजी तिसऱ्याच नेत्याचा गृहमंत्रिपदासाठी विचार करत आहेत. कोरोना काळात राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या राजेश टोपेंकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यास गृहमंत्रिपदासाठी राजेश टोपेंचे नाव आघाडीवर असेल, तसेच गृहमंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे जाईल अशी शक्यता आहे.   

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी हाताळलं आहे, त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरू होती. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलRajesh Topeराजेश टोपे