शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

"महाराष्ट्रात कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवला नव्हता" त्या विधानावरून फडणवीसांचा अनिल देशमुखांना टोला

By बाळकृष्ण परब | Updated: September 21, 2020 16:27 IST

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

ठळक मुद्देआपण तसं विधान केलं नसल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यांना संशयाचा फायदा देऊया पण गृहमंत्र्यांच्या बोलण्याचा असा अर्थ निघणे हे काही योग्य नाहीस्वत: पोलिसांवर अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यांनं म्हटलं की महाराष्ट्राचा अवमान झाला म्हणून कांगावा करायचा, हे योग्य नाही

मुंबई - राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केला होता, असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतील केले होते. मात्र या विधानाबाबत नंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले. पण या विधानामुळे गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. आता विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर असा अविश्वास दाखवला नव्हता. आम्ही सत्तेत आलो तेव्हाही आधीच्या काळातीलच पोलीस होते. मात्र आम्ही त्यांना सोबत घेत चांगल्या प्रकारचे काम केले. सरकार सांगते त्याप्रमाणे पोलिसांना काम करावे लागते.आता आपण तसं विधान केलं नसल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यांना संशयाचा फायदा देऊया. पण गृहमंत्र्यांच्या बोलण्याचा असा अर्थ निघणे हे काही योग्य नाही. स्वत: पोलिसांवर अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यांनं म्हटलं की महाराष्ट्राचा अवमान झाला म्हणून कांगावा करायचा, हे योग्य नाही, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते अनिल देशमुखकाही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. लोकमत ऑनलाइनच्या ह्यग्राउंड झीरोह्ण कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले होते. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले होते की, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.नंतर या विधानाचा केला इन्कारपोलीस अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्नह्ण, या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खळबळजनक मुलाखतीचे पडसाद राज्यभर उमटले होते. नंतर मात्र, देशमुख यांनी ह्यत्याह्ण विधानाचा इन्कार केला असून आपल्या तोंडी ते वक्तव्य टाकले, असा खुलासाकेला होता. माझ्या तोंडी चुकीच्या पद्धतीने ते वक्तव्य टाकण्यात आले, असा खुलासा गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघात बोलताना केला होता.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसPoliticsराजकारण