शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवा दुवा; कोण आहे विलास चव्हाण?

By प्रविण मरगळे | Updated: February 21, 2021 08:25 IST

Who is Vilas Chavan in Pooja Chavan suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, यात प्रामुख्याने एक नाव समोर आलं ते म्हणजे अरूण राठोड

ठळक मुद्देया प्रकरणाच्या चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. पोलिसांनी अरूण राठोड याची चौकशीही केली आहे.व्हायरल होणाऱ्या सोशल मीडिया क्लिपमध्ये विलास चव्हाण याचाही आवाज आहे. विलास चव्हाणची पोलिसांनी चौकशी केली का? अरूण राठोड आणि कथित मंत्री यांच्यासोबत आणखी एक आवाज कोणाचा?

मुंबई – पूजा चव्हाणआत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अद्यापही राज्यात संशयाचं वातावरण आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात पुढे आल्याने आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, गेल्या १३ दिवसांपासून संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) अज्ञातवासात असून या प्रकरणी त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही, त्यामुळे प्रकरणाचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. (Who is Vilas Chavan in Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, यात प्रामुख्याने एक नाव समोर आलं ते म्हणजे अरूण राठोड(Arun Rathod)..या प्रकरणाच्या चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. पोलिसांनी अरूण राठोड याची चौकशीही केली आहे. मात्र याच व्हायरल होणाऱ्या सोशल मीडिया क्लिपमध्ये विलास चव्हाण(Vilas Chavan) याचाही आवाज आहे. विलास चव्हाण आणि कथित मंत्री यांच्यातही संवाद झाला आहे, पुण्यातील ज्या इमारतीत पूजा चव्हाण, अरूण राठोड आणि विलास चव्हाण राहत होते, तेथील रहिवाशांनी सांगितल्या माहितीनुसार विलास चव्हाण हा पूजा चव्हाणचा चुलत भाऊ असल्याचं सांगितलं गेलं.

आता विलास चव्हाण कोण अशी चर्चा सुरू झाली आहे, विलास चव्हाण हा वनविभागातील सामाजिक वनीकरण विभागात नोकरीला होता, विलास याठिकाणी जानेवारी महिन्यापासून काम करत होता, शिपाईपदावर त्याला नोकरी लागली होती, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या जेमतेम एक महिना आधी तो त्याठिकाणी नोकरीला लागला होता. विलास चव्हाणची कार्यालयीन वर्तवणूक चांगली होती, कंत्राटदार कंपनीकडून त्याची नेमणूक करण्यात आली होती. अरूण राठोड हादेखील वनविभागात कामाला होता.

पूजा चव्हाण प्रकरणात अरूण राठोडचा नाव प्रखरतेने समोर येतं, परंतु जर विलास चव्हाण पूजा चव्हाणचा चुलत भाऊ असेल तर बहिणीच्या आत्महत्येनंतर तो समोर का आला नाही. विलास चव्हाणची पोलिसांनी चौकशी केली का? अरूण राठोड आणि कथित मंत्री यांच्यासोबत आणखी एक आवाज कोणाचा? हे पोलिसांनी शोधणं गरजेचे आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ

वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. तिच्या शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. नंतर तिला सुटी देण्यात आली. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणे डॉक्टर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासातच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोड आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख सहा दिवस रजेवर होते. ते मंगळवार (१६ फेब्रुवारी) पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र बुधवारी विभाग प्रमुख रुग्णालयात दिसलेच नाही. या घटनाक्रमाबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. युनिट १ विभाग प्रमुखांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे त्या तरुणीवरील उपचाराचा उलगडा झालेला नाही. रुग्णालय प्रशासनाकडून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही.

पूजा चव्हाण भाजपात होती

पूजा चव्हाण हिचं फेसबुक अकाऊंट सर्च केलं असता ती भाजपाच्या बंजारा युवती आघाडीची पदाधिकारी असल्याचं दिसून येतं, तसेच बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडे यांच्यासोबत प्रचार करतानाचेही फोटो आहेत. त्यामुळे पूजा ही भाजपाची कार्यकर्ता होती हे दिसून येते.     

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. ती अतिशय डॅशिंग होती. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

 

 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडPoliceपोलिसSuicideआत्महत्या