शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘सरदारांच्या पुतळ्यामुळे नेहरूंना कमीपणा नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:39 AM

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कमीपणा आणण्यासाठी उभारलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे गुरुवारी सांगितले.

अमरेली : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कमीपणा आणण्यासाठी उभारलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे गुरुवारी सांगितले.प्रचारसभेत ते म्हणाले की, सरदार पटेल हे काँग्रेसचे नेते होते. मात्र आजवर एकाही काँग्रेस नेत्याने या पुतळ्याला भेट दिलेली नाही. सरदार पटेल यांचे कर्तृत्वच एवढे महान आहे की त्यांच्यापुढे इतरांना खुजे दाखविण्याचे काहीच कारण नाही. केंद्र सरकारने केलेल्या कठोर कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमधील दोन-अडीच जिल्ह्यांपर्यंतच आता दहशतवादी कारवाया मर्यादित राहिल्या आहेत. याआधी पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, काशी, जम्मू अशा अनेक ठिकाणी अधूनमधून बॉम्बस्फोट झाल्याचे ऐकण्यात येत असे. पण गेल्या पाच वर्षांत देशात कुठेही बॉम्बस्फोट घडलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरचा प्रश्न चिघळला. जम्मू-काश्मीरमधील काही भाग वगळला, तर त्या राज्याच्या अन्य भागात शांतता आहे. मुंबईवर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेस केंद्रात सत्तेवर होती. त्या हल्ल्याला काँग्रेसने चोख दिले नाही. आमच्या राजवटीत मात्र सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. (वृत्तसंस्था)>कणखर सरकार निवडून आणण्याचे आवाहनलोकसभा निवडणुकांत केंद्रामध्ये कणखर सरकार निवडून आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केले. कर्नाटकातील बागलकोट येथे गुरुवारी एका प्रचारसभेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, कणखर सरकार पाहायचे असेल तर दिल्लीतील आमच्या सरकारकडे बघा, दुबळे सरकार पाहायचे असेल तर कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारकडे पाहा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019