शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती 

By ravalnath.patil | Published: September 27, 2020 8:32 AM

शिवसेनेनंतर आता दुसऱ्या सर्वात जुना घटक पक्ष भाजपाने गमावला. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का आहे.

ठळक मुद्देभाजपा आणि अकाली दल यांची ही युती दोन दशकांहून जास्त जुनी होती. १९९२ वर्षांपर्यंत पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या.

नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती शनिवारी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी दिली आहे. 

याआधी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील अकाली दलाच्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी अन्न व प्रक्रिया मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. यानंतर संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांवरून सरकारला विरोध केल्यामुळे अकाली दल आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोन्ही पक्षांमधील युती संपुष्टात आली. शिवसेनेनंतर आता दुसऱ्या सर्वात जुना घटक पक्ष भाजपाने गमावला. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का आहे.

भाजपा आणि अकाली दल यांची ही युती दोन दशकांहून जास्त जुनी होती. १९९२ सालापर्यंत पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी ते पुढे आले होते. दरम्यान, अकाली दल केवळ एनडीएमधील सर्वात जुन्या घटक पक्षांपैकी एक नव्हता, तर तो एनडीएमधील सर्वात जुना पक्ष होता.

भाजपा आणि अकाली दल हे १९९६ मध्ये अकाली दलाच्या मोगा डेक्लरेशन नावाच्या एका करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एकत्र आले होते. त्यानंतर, दोन्ही पक्षांनी पहिल्यांना १९९७ मध्ये मिळून निवडणूक लढविली. तेव्हापासून भाजपा आणि अकाली दलाची युती होती. मोगा डेक्लरेशन हा एक सामंजस्य करार होता. त्यामध्ये पंजाबी ओळख, परस्पर बंधुता आणि राष्ट्रीय सुरक्षा या दृष्टिकोनाविषयी तीन मुख्य गोष्टींवर जोर देण्यात आला होता. दरम्यान, १९८४ सालानंतर पंजाबमधील वातावरण खूपच वाईट बनले होते, अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी या मूल्यांशी हातमिळवणी केली होती.

राजकीय विश्लेषकांनी या युतीकडे असे पाहिले होते की, त्यावेळी अकाली दल संपूर्ण शीख समाजाला एकत्र करू शकत नव्हता. शीख समाज फूट पाडून मतदान करत होता. अशा परिस्थितीत अकाली दलाला भाजपा हा एक सहयोगी पक्ष पाहिला, जो आपल्या वोटबँकेला धक्का न लावता ते वाढविण्याचे काम करेल आणि दुसरा इतर कोणताही पक्ष त्यांना मिळाला नाही. कारण, १९८४ च्या दंगलीनंतर जे घडले, त्यामुळे काँग्रेसला अशा आघाडीसाठी अयोग्य ठरविले. त्यामुळे अकाली दलाने भाजपाशी युती केली.

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाबरोबर झालेल्या युतीचा फायदा अकाली दलालाही झाला. पंजाबमध्ये एकच पक्ष आहे, जो गेल्या काही दशकांत सलग दोन निवडणुका जिंकू शकला आहे. आणि ती म्हणजे भाजपा आणि अकाली दलाची युती. ही युती पंजाबमध्ये २००७ ते २०१७ पर्यंत सत्तेत राहिली. या युतीचे दिवस नेहमीच चांगले राहिले नाहीत. बर्‍याच वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा दोन्ही पक्षांची युती तुटली नव्हती. पण, अखेर संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांयावरून अकाली दलाने केंद्रातील एनडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

आणखी बातम्या...

- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा

- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"    

- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात

- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु        

टॅग्स :Shiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलBJPभाजपाPunjabपंजाबPoliticsराजकारण