शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

मोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

By कुणाल गवाणकर | Updated: September 21, 2020 22:25 IST

काँग्रेसकडून सातत्यानं टीका होत असलेल्या मंत्र्यांचं सुळेंकडून कौतुक

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यानंतर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे सर्वसामान्यांना भोगावा लागलेला त्रास, अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था यावरून विरोधक सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यावरूनही विरोधकांनी सीतारामन यांच्यावर टीका केली. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं २० लाख कोटींचं पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचलं, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार उपस्थित केला. मात्र काँग्रेसनं सातत्यानं टीका केलेल्या सीतारामन यांचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज संसदेत कौतुक केलं. त्यामुळे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद'निर्मला सीतारामन यांचं मंत्रालय नेहमी इतर विभागांपेक्षा चांगली कामगिरी करतं. आमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात. पण मला अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांच्या कामाचं कौतुक करावंसं वाटतं. ते सातत्यानं विधेयकं सादर आणून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांत सुळेंनी अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं कौतुक केलं. सुळेंच्या या स्तुतीसुमनांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.विशेष म्हणजे लोकसभेत अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या सुप्रिया सुळे संसदेबाहेर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या. काल राज्यसभेत प्रचंड गदारोळात शेतीशी संबंधित दोन विधेयकं मंजूर झाली. सरकारनं आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता कामकाज रेटून नेलं आणि विधेयकं मंजूर केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे खासदार संसदेबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस