शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आमदार रोहित पवारांची आरे सफारी; रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले अन् आणखी बरचं काही…

By प्रविण मरगळे | Updated: February 11, 2021 12:37 IST

NCP Rohit Pawar in Aarey Colony: पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता, त्यावर ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला,

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना अनेकदा आपण सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळताना पाहिलं असेल, कधी चहाच्या टपरीवर तर कधी युवकांसोबत कट्ट्यावर दिसतात, आत मुंबईतील आरे कॉलनीत येऊन पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांसोबत आमदार रोहित पवारांनी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले आणि आरेत बाईकवरून फेरफटकाही मारला. यावेळी स्थानिक रहिवाशांनी रोहित पवारांकडे विविध मागण्यादेखील केल्या.

पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता, त्यावर ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला, मात्र जंगलतोड होऊ नये यासाठी पर्यावरणप्रेमी आंदोलनकर्त्यांवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले होते, हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच स्थानिक आदिवासींच्या घराचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून सोडवण्यात यावा अशी मागणी आमदार रोहित पवारांना करण्यात आली.

रोहित पवारांनी या लोकांना समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं, राज्य सरकारनं आरेतील जंगल वाचवलं आहे, त्याठिकाणी आणखी झाडं आपण लावू. केंद्र सरकारने मेट्रो कारशेडचं राजकारण करू नये, राज्य सरकारशी सहकार्य करावं, कोणताही अंहकाराचा मुद्दा यात आणू नये असं सांगत रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्तेही उपस्थित होते, आमदार रोहित पवारांनी न्यूझीलंड हॉस्टेललाही भेट दिली, तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच व्हॉलीबॉल आणि क्रिकेटचा आनंदही घेतला, त्याचसोबत नारळ विक्रेत्यासोबत गप्पाही मारल्या.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMetroमेट्रोAarey Coloneyआरे