ncp mla amol mitkari warns bjp leader chandrakant patil over dhananjay munde issue | "...तर तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागचे काळे कारनामे बाहेर येण्यास वेळ लागणार नाही"

"...तर तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागचे काळे कारनामे बाहेर येण्यास वेळ लागणार नाही"

मुंबई: बलात्काराचे आरोप झालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून रस्त्यावर उतरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाटील आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. अन्यथा तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागे असलेले काळे कारनामे बाहेर यायला वेळ लागणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.

गायिकेनं बलात्काराचे आरोप केलेल्या धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभी राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. यावरून आज चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्याला मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'धनंजय मुंडेंवरील आरोपांबद्दल चंद्रकांत पाटलांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सोमवारपासून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. सध्या भाजपला विकास, गॅस दरवाढ, शेतकरी आंदोलन, वाढते इंधन दर यावर बोलायला वेळ नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कुरापती काढण्याचे प्रकार सुरू आहेत, असं मिटकरी म्हणाले.

भाजपा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून आंदोलन करणार : चंद्रकांत पाटील

धनंजय मुंडेंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या सर्व घटना लोकांसमोर मांडल्या आहेत. भाजपचेच माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्वत: त्यांनादेखील अशाच घटनेचा सामना करावा लागल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यासोबतही हनी ट्रॅपचा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपनं अनैतिकतेच्या गप्पा करू नयेत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. नाही तर तुमच्या अनेक लोकांचे काळे कारनामे जे पडद्यामागे आहेत, ते बाहेर यायला वेळ लागणार नाही, असा इशाराच मिटकरी यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली देऊन सुद्धा शरद पवार कारवाई का करत नाही? भाजपचा हल्लाबोल 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत चुकीच्या गोष्टींवरून आजपर्यंत कुणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी वेळोवेळी अशा घटनांच्या वेळी कठोर भूमिका स्वीकारलेली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र काल झालेल्या बैठकीत पवार यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांनी यावेळी रेणू शर्मा यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर झालेल्या आरोपाच्या चौकशी तुम्ही पोलीस सीआयडी, आणि चालत असेल तर सीबीआय कडून देखील करा. त्याबद्दल आम्हाला काही देणे घेणे नाही. मात्र, धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांच्यासोबत माझे गेल्या काही वर्षांपासून शारीरिक संबंध होते. तसेच त्यांच्यापासून मला दोन मुले आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना माझी नावे देखील दिली आहे, या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. परंतू, धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिल्यावर सुद्धा शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र याच मुद्द्यांवर आमचा आक्षेप असून मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा किंवा पवारांनी तो घ्यावा अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे आहे. भारतीय समाज हा नीतिमूल्ल्यांवर चालतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

Web Title: ncp mla amol mitkari warns bjp leader chandrakant patil over dhananjay munde issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.