शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा, राष्ट्रवादीचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 15:38 IST

Nawab Malik : बाबा रामदेव यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

ठळक मुद्देरामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात. त्यापेक्षा दुर्दैवी घटना होऊ शकत नाही, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही, तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, बाबा रामदेव यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देवू शकतात. मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे, असे नवाब मलिक म्हणाले. (NCP leader Nawab Malik Targets Ramdev Baba Over His Comments On Medical Therapy)

केंद्रीय आरोग्य विभागाने बाबा रामदेव यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पद्धतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनवण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

("भविष्यवाणी खरी ठरत नसल्यामुळे भाजपा नेते हताश, त्यामुळेच तारीख पे तारीख…", नवाब मलिकांचा टोला)

याचबरोबर, बाबा रामदेव डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच, देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास...अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात. त्यापेक्षा दुर्दैवी घटना होऊ शकत नाही, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते बाबा रामदेव?गेल्या काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नही अलोपॅथीला विचारले होते. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते. बाबा रामदेव यांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी असे त्यांना सुनावले होते. पण, बाबा रामदेव यांनी डॉक्टरांवर पुन्हा टीका केली होती.

बाबा रामदेव यांच्याविरोधात 1 हजार कोटींचा मानहानीचा दावाइंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील एक नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना धाडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीचे 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर बाबा रामदेव यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकBaba Ramdevरामदेव बाबाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण