"शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज", नवाब मलिकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:05 PM2021-05-26T16:05:45+5:302021-05-26T16:07:13+5:30

Nawab Malik : एखादा विषय प्रलंबित ठेवणे किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.

NCP leader Nawab Malik criticizes PM Narendra Modi over farmers agitation | "शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज", नवाब मलिकांचा हल्लाबोल

"शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज", नवाब मलिकांचा हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देआज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला देशातील 12 महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वतीने एका पत्रकावर स्वाक्षरी करत समर्थन दिले आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र, अद्यापही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्यामुळे शेतकरी संघटनांनी या नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचे आवाहन केले असून आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितले आहे. (NCP leader Nawab Malik criticizes PM Narendra Modi over farmers agitation)  

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्र सरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. एखादा विषय प्रलंबित ठेवणे किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.  

आज केंद्राच्या तीन जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण आहेत. आज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकांनी काळी फित लावून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. याचबरोबर केंद्र सरकारने जे कृषी कायदे केले आहेत. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शेतकरी या कायद्यांविरोधात 6 महिने आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्राला शेतकरी विरोधात आहेत, हे कळले पाहिजे आणि केंद्र सरकारने कायदे मागे घेतले पाहिजेत, असे नबाव मलिक यांनी म्हटले आहे.

'केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी' 
नवाब मलिक यांनी कोरोना लसीकरणावरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्षावरील लोकांची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. मात्र लस मिळत नाही. केंद्राला पैसे अपेक्षित असतील तर त्यांनी पैसे जमा करा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो, त्याबद्दल सांगावे, असे नवाब मलिक म्हणाले. याशिवाय, देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्‍याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाचं एक धोरण ठरवावे आणि लसीची अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आता तरी केंद्राने एक राष्ट्रीय धोरण तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

(आनंद महिंद्रांकडून जपानला 'मुंबई मॉडेल' अवलंबण्याचा सल्ला; युजर्स म्हणाले...)

देशातीत 12 प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा
आज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला देशातील 12 महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वतीने एका पत्रकावर स्वाक्षरी करत समर्थन दिले आहे.  यामध्ये सोनिया गांधी (काँग्रेस), एचडी. देवेगौडा (जेडीएस), शरद पवार (राष्ट्रवादी), ममता बॅनर्जी (तृणमूल), उद्धव ठाकरे (शिवसेना), एमके स्टालिन (डीएमके), हेमंत सोरेन (जेएमएम), फारुक अब्दुल्ला (जेकेपीए), अखिलेश यादव (आरजेडी), डी. राजा (सीपीआय), सिताराम येचुरी (सीपीआय- एम) यांचा समावेश आहे. 

Web Title: NCP leader Nawab Malik criticizes PM Narendra Modi over farmers agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.