शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 15:44 IST

ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit: महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलून देशमुखांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेणार

नवी दिल्ली: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे."शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं"; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भागगृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करुनच घेऊ. उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल. पण त्याआधी सर्वांशी चर्चा करण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांची बाजू जाणून घेऊनच निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं. देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतली, असंदेखील पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...पत्राच्या टायमिंगकडे वेधलं लक्षराज्यात गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास सुरू आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही चौकशी सुरू आहे. या घडामोडी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला गेले आणि त्यानंतर लगेच काही दिवसांत परमबीर सिंग यांचं पत्र समोर आले, असं म्हणत पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या टायमिंगकडे लक्ष वेधलं.मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट; शरद पवार हसले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले "हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंग