शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांचा थेट गृहमंत्र्यांना फोन; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: January 10, 2021 15:44 IST

भाजप नेत्यांच्या सुरक्षेत ठाकरे सरकारकडून कपात; भाजप नेत्यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई: ठाकरे सरकारनं राज्यातील भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आहे."ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार"ठाकरे सरकारने फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढले आहे. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी केली आहे. यापुढे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा नसेल. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी चिंता व्यक्त केली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे.ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपातसुरक्षेत कपात करण्यात आल्यानं ठाकरे सरकारवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. ही टीका सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. माझी सुरक्षा कमी करा, असं पवारांनी देशमुख यांना सांगितलं. 'मी स्वत: सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या,' असं पवारांनी गृहमंत्र्यांना सांगितल्याचं कळतं.युवासेनेच्या वरूण सरदेसाईंवर ठाकरे सरकारची कृपादृष्टी; ‘या’ दर्जाची सुरक्षा मिळणार

फडणवीसांना आता वाय प्लस सुरक्षारात्री उशिरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.काही मंत्र्यासह इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपातकाही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपा