ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात

By प्रविण मरगळे | Published: January 10, 2021 11:40 AM2021-01-10T11:40:54+5:302021-01-10T13:26:26+5:30

मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती

Big reduction in security of Devendra Fadnavis, Raj Thackeray, Chandrakant patil & BJP Leaders | ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात

ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत कायमचं बिनसलं अन् शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात तिन्ही पक्ष सत्तेवर आले, त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकावर बसावं लागलं. यानंतर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वादामुळे भाजपा आणि सत्ताधारी एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करू लागले.

आता महाविकास आघाडीने घेतलेल्या एका निर्णयाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दणका बसला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून आता फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आले आहे, तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे.

रात्री उशीरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.

इतकचं नाही तर काही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

 

Web Title: Big reduction in security of Devendra Fadnavis, Raj Thackeray, Chandrakant patil & BJP Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.