शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार?; राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 11:12 IST

सुजय विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय धुळवड सुरू झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा भाजपानं लावला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनंभाजपानं निशाणा साधला. 'ज्यांना आम्ही नाकारलं, त्यांना का गोंजारता?' असा सवाल राष्ट्रवादीनं पोस्टरमधून विचारला आहे. या पोस्टरवर कुठेही भाजपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी लक्षात घेतल्यास हे पोस्टर कोणासाठी लावण्यात आलं आहे, हे ओळखणं फारसं अवघड नाही.माढ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील माढ्याचे खासदार आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना हाती कमळ घेतलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं भाजपावर पोस्टरमधून निशाणा साधला. 'दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार?', असे प्रश्न राष्ट्रवादीनं उपस्थित केले आहेत. मुंबईतल्या विविध भागांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सध्या या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. सोलापूरमधील दिग्गज नेते असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं पक्षात स्वागत करताना, विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंहांना आशीर्वाद दिला आहे. तेदेखील मनानं भाजपामध्ये आले आहेत, असं सूचक विधान केलं. त्याआधी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये सुरू असलेल्या या इनकमिंगवर राष्ट्रवादीनं पोस्टरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलSujay Vikheसुजय विखे