शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
3
Radhika Yadav : "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
4
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
5
मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
6
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
7
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
8
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
9
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
10
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
11
Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
12
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
13
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग
14
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
15
Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
16
भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
17
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
18
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
19
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
20
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

“नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अन् देशाचा भ्रमनिरास केला”; एकनाथ खडसेंनी ‘ते’ रिट्विट केलं डिलीट

By प्रविण मरगळे | Updated: October 21, 2020 13:30 IST

BJP Eknath Khadse, PM Narendra Modi News: एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर खडसेंना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका करणाऱ्या खडसेंनी पहिल्यांदाच साधला होता पंतप्रधानांवर थेट निशाणामोदींच्या भाषणानं महाराष्ट्र आणि देशाचा भ्रमनिराश केला, या जयंत पाटलांच्या ट्विटला खडसेंनी केलं होतं रिट्विट'लोकमत ऑनलाइन' या संदर्भात बातमी केल्यानंतर एकनाथ खडसेंकडून ते रिट्विट तातडीनं डिलीट करण्यात आलं.शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी जळगावात खडसे समर्थकांनी जोरदार तयारी केली असून भाऊ तुम्ही सांगाल ते धोरण अन् बांधाल ते तोरण अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईत २२ ऑक्टोबर रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला येण्याची तयारी सुरु केली आहे.

एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर खडसेंना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारच्या मोदी भाषणावर टीका करणारं ट्विट केलं होतं, यात लिहिलं होतं की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र उत्सुकता म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट केलं होतं, परंतु काही काळातच एकनाथ खडसेंनी रिट्विट डिलीट केले आहे.

हे ट्विट डिलीट केलं

 जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल

एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं, मागील वेळी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडेही तेव्हा पक्षाच्या सक्रीय कार्यातून बाहेर पडल्या होत्या. पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न केला, त्यावर पंकजा म्हणाल्या की, चर्चा चर्चा असताच जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटत नाही खडसेसाहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील असं त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नाथाभाऊ पक्ष सोडणार नाही

भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर चार वर्ष ते मंत्रिमंडळाच्या बाहेर होते, विधानसभा निवडणुकीतही एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यानंतर विधानपरिषद जागेसाठीही खडसेंना संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरु झाली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी