शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी केले ब्लॅकमेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 05:48 IST

राजकारणात ब्लॅकमेलर असता कामा नये व जे आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मुंबई : देशातील अनेक पक्ष काँग्रेससोबत आघाडी करायला तयार होते. मात्र, नरेंद्र मोदींनी विविध केसेसच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले. त्यामुळे अनेक ठिकाणी आघाडी झाली नाही. इतके दिवस भाजपला विरोध करणाºया शिवसेनेने त्यांच्याशी युती का केली, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करण्याची गरज आहे. राजकारणात ब्लॅकमेलर असता कामा नये व जे आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांच्या प्रचारार्थ विक्रोळी कन्नमवार नगर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी एमआयएमचे आमदार अ‍ॅड. वारीस पठाण उपस्थित होते. वारीस पठाण म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सरकार सातत्याने करत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुस्लीम, दलितांवर सातत्याने अत्याचार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. मोदी खोटारडे आहेत. देशाची जनता त्यांच्या घोषणाबाजीला कंटाळली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने उमेदवारी दिली. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वीने केलेले वक्तव्य लांच्छनास्पद असल्याची टीका त्यांनी केली.‘हिरानंदानीचा घोटाळा बाहेर काढू’राहुल गांधींनी मुंबईकरांना ५५० चौ. फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, याआधी काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २७० फुटांचा खुराडा दिला, अशी टीका त्यांनी केली. हिरानंदानीने २ हजार फ्लॅटचा घोटाळा केला. त्यांना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी घातले. आमची सत्ता आल्यास हिरानंदानीने बळकावलेल्या २ हजार फ्लॅटचा घोटाळा बाहेर काढू, असे आंबेडकर म्हणाले.‘विरोधकांकडून पैसे घ्या; मते वंचितलाच द्या’प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विरोधकांचे ‘मनी’रत्नम सुरू होईल. त्यांच्याकडून पैसे घ्या, मात्र मते वंचित बहुजन आघाडीलाच द्या, असे वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी या वेळी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर