शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet reshuffle: नितेश राणे दिल्लीत, नारायण राणे मोदींच्या भेटीला; दिल्लीत हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 13:03 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: नुकतेच नारायण राणे आणि कपिल पाटील, भारती पवार, डॉक्टर भागवत कराड हे पीएम मोदी यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. यापैकी कोणाला राज्य मंत्री पदे मिळतील आणि कोणाला कॅबिनेट याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. आज सायंकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) होणार आहे. 

Modi Cabinet Expansion: नवी दिल्ली: मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार कोणाचा पत्ता कट होणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात असताना राज्याचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार कपिल पाटील (Kapil Patil) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) हे दिल्लीला पोहोचल्याने राणेंचे मंत्रिपद फिक्स झाल्याचे बोलले जात आहे. (Nitesh Rane arrived in Delhi, Narayan rane, kapil Patil went to meet PM Narendra Modi)

Cabinet reshuffle: महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याला दिल्लीतून बोलावणे; मराठवाड्यात चर्चांना उधाण

नारायण राणेंनी त्यांच्यावर आलेल्य़ा सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. मी नेहमी दिल्लीला येत असतो. माझा भाऊ निलेश राणे खासदार होता. नारायण राणे आता खासदार आहेत. यामुळे दिल्लीवारी असायची. काल राज्यातील अधिवेशन पार पडले. ते आटोपून मी दिल्लीत आलो आहे. नारायण राणेंना मोदींना भेटून बाहेर येऊदेत, सर्व माहिती मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. 

 

नारायण राणे मंगळवारी सपत्नीक दिल्लीला पोहोचले आहे. नुकतेच ते आणि कपिल पाटील, भारती पवार, डॉक्टर भागवत कराड हे पीएम मोदी यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. यापैकी कोणाला राज्य मंत्री पदे मिळतील आणि कोणाला कॅबिनेट याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. आज सायंकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) होणार आहे. 

Cabinet Reshuffle: इतिहासात जे कधीच घडलं नाही ते नरेंद्र मोदींनी ‘करून दाखवलं’; मंत्रिमंडळ फेरबदलात काय आहे स्पेशल?

दी मंत्रिमंडळाचा विस्तार (Narendra Modi Cabinet expansion) आज सायंकाळी ६ वाजता केला जाणार आहे. मोदींनी आजची कॅबिनेट बैठक रद्द केली असून ज्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत त्यांना दोन दिवसांपासून दिल्लीला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सर्व नेते दिल्लीतमिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव,  दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच  लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येउ शकते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी