शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 17:20 IST

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

कणकवली : नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. कारण, अमित शाह अशी व्यक्ती आहेत की, जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली. कारण, अमित शाह अशी व्यक्ती आहेत की, जे पंतप्रधानांना विनंती करु शकतात, सहकाऱ्यांना सूचना देतात आणि कनिष्ठांना आदेश देतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

याचबरोबर, नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शाह यांना विनंती करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. याशिवाय, कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नारायण राणेंवर भाजपामध्ये अन्याय होणार नाही- अमित शहाअमित शहा यांनीही नारायण राणे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. "नारायण राणे हे अन्यायाविरोधात पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. ते अन्याय होत असेल तर भविष्याचा कोणताही विचार न करता अन्यायाचा प्रतिकार करतात. म्हणूनच त्यांची वाटचाल ही वळणावळणाची राहीली आहे. त्यांचा सन्मान आणि आदर कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ग्वाही मी देतो", असे अमित शहा म्हणाले.

नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते - देवेंद्र फडणवीसदबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरुन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होते. 650 हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNarayan Raneनारायण राणे Amit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsindhudurgसिंधुदुर्गMedicalवैद्यकीय