शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: ...म्हणून शिवसेनेने भाजपला घेतले शिंगावर; एकत्र येण्याचे प्रयत्न फसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 09:33 IST

मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा राजकीय गदारोळ, नेमका कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आज सांगणे कठीण असले तरी, आमच्या खेळीमुळे शिवसेना मात्र एकत्र आली, हे वास्तव नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेले काही दिवस भाजपचे नेते शिवसेनेवर सतत टीकास्त्र सोडत होते. कधी शिवसेना भवन फोडण्याची तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘आरे-तुरे’ची भाषा सुरू झाली. तरीही शिवसेना काहीच बोलत नव्हती. त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली, अशा चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानफडात मारण्यापर्यंत भाषा गेली, तेव्हा मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपला शिंगावर घेण्याचा निर्णय घेतला. भाजपने स्वतःच्या राजकीय खेळीने संपूर्ण शिवसेनेला त्वेषाने एकत्र येण्यास भाग पाडले. त्यामुळे आज तरी या राजकीय नाट्यात शिवसेनेची सरशी झाल्याचे चित्र आहे; मात्र या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले...

मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा राजकीय गदारोळ, नेमका कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आज सांगणे कठीण असले तरी, आमच्या खेळीमुळे शिवसेना मात्र एकत्र आली, हे वास्तव नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. अगदी सुरुवातीला शिवसेना भवनावर भाजपने मोर्चा काढला त्यावेळी शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी निकराने त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आ. प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यावर जोरदार टीका सुरू झाली. त्यानंतर लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली; मात्र तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. पुढे शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेकडून मनसेने परप्रांतीयांविषयीची केलेली विधाने पुढे केली गेली. जैन आणि गुजराती समाजाविषयी मनसेने केलेल्या आंदोलनांचे फोटो व्हायरल झाले. या सगळ्यांचा भाजपाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे, असे दिसू लागले. 

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

दरम्यान, भाजपने राणे यांना केंद्रीय मंत्री केले.  राणे यांची जनसंवाद यात्रा शिवसेनाप्रमुख यांना वंदन करून कशासाठी? असा सवाल भाजपच्या काही नेत्यांनी दबक्या आवाजात केला; पण राणे यांच्या आक्रमकपणापुढे कोणाचेही फारसे चालले नाही. त्यामुळे भाजपला यात्रा काढतानासुद्धा शिवसेनेची गरज पडते, अशी टीका शिवसेनेकडून सुरू झाली. 

यात्रेदरम्यान राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची, शिवसेनेत घुसमट होत आहे. ते रबर स्टॅम्प आहेत, अशा पद्धतीची टीका केली. चोहोबाजूंनी शिवसेनेवर असे हल्ले होऊ लागले, तरीही शिवसेना गप्प होती. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, अशी टीका शिवसेनेवर सुरू झाली. त्यामुळे जास्त गप्प राहिलो तर डोक्यावरून पाणी जाईल, असा मतप्रवाह पक्षात वाढीला लागत असतानाच राणे यांच्या ‘त्या’ विधानाने कळस चढवण्याचे काम केले. 

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले 

आजच्या राजकीय डावाचा फायदा कुणाला?मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची राडेबाजी झाली. सत्ता असूनही शिवसेनेत अस्वस्थता होती. मंत्री जुमानत नाहीत, कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशा भावना वाढीस लागल्या होत्या. त्याच वेळी हा सगळा प्रकार घडल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र आले. याचा फायदा शिवसेनेलाच होईल, असे सांगितले जात आहे. 

...अशी हलली सूत्रेराणे आणि भाजप नेते थेट घरात घुसण्याची भाषा करत अंगावरच येत आहेत, हे पाहून राणे यांना धडा शिकवण्याचे ठरले. त्यातून त्यांच्या विधानाचा कायदेशीर अभ्यास केला गेला आणि पुढची सूत्रे वेगाने हलली. 

Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार 

शिवसेनेच्या जवळ जाण्याचे प्रयत्न राणे यांनी हाणून पाडले

  • जे झाले ते झाले आपण पुन्हा एकत्र येऊ, असे म्हणत भाजपचे काही नेते गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांना भेटले होते. आपण पुन्हा एकत्र सरकार बनवू, असा प्रस्ताव त्यांना देण्यात आला. त्यावेळी ठाकरे यांनी त्याला सहमती दर्शवली होती. मुख्यमंत्रीपद एक वर्ष ते सहा महिने सेनेकडे राहील. 
  • एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या दोघांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे. नंतर मुख्यमंत्रीपद भाजपने स्वतःकडे घ्यावे. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागांचे वाटपही आताच ठरवून घ्यावे. 
  • त्या बैठकीतच नारायण राणेदेखील आपली भूमिका बदलतील आणि शिवसेनेबद्दल चांगली विधाने करतील, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते; मात्र त्यावर उद्धव ठाकरे यांनी काडीचाही विश्वास दाखवला नाही. तेव्हा तो विषय तेथेच थांबवण्यात आला; मात्र आता आमच्या या सगळ्या प्रयत्नांवर राणे यांच्या विधानाने पाणी पडले, असेही भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना