शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Narayan Rane: “आमची वर सत्ता आहे हे लक्षात ठेवा,” जनआशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे सरकारला नारायण राणेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:16 IST

Narayan Rane News: काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई - राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबईसह राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Jana Aashirwad Yatra ) दरम्यान, काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Narayan Rane) दरम्यान, या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेना आणि राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. (Narayan Rane's warning to the Thackeray government who filed a case against Jana Aashirwad Yatra )

नारायण राणे यांनी आज जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे करा. मात्र दिल्लीत आमची सत्ता आहे हे लक्षात असू द्या. तुमच्यापेक्षा आम्ही वर आहोत. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकराचे गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण करणाऱ्या शिवसैनिकांनाही नारायण राणे यांनी टोला लगावला. त्यांना गोमुत्र शिंपडायचं असेल तर शिंपडू द्या, गोमुत्र प्यायचं असेल तर पिऊ द्या, मात्र आधी मन तरी शुद्ध करा. माझ्यामुळे जर त्यांच्या वडिलांचं स्मारक अपवित्र होणार होतं तर उद्धव ठाकरेंनी मला अडवायला हवं होतं. मी असतो तर अडवलं असतं. पण काल तिथे कुणीचं नव्हते. नंतर पैसे देऊन हे नाटक करून घेतलं, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

आज सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही नारायण राणे यांनी टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी हिंदुत्त्वाची होती. त्यांनी सत्तेसाठी कधी या हिंदुत्ववादी विचारसरणीशी तडजोड केली नाही. उलट आजची शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली आहे आणि आज सोनिया गांधींसोबत होणारी बैठक म्हणजे लाचारीचा एक भाग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत हे सरकार उदासिन आहे. त्यामुळेच ते आरक्षणाबाबत टाळाटाळ करत आहेत. तसेच आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

दरम्यान, भाजपने काल  आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी या पोलीस ठाण्यांत आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा