शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 20:55 IST

काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

ठळक मुद्देराज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेस पक्षाला अनुकुल आहेकाँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्यायराज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर

मुंबई:काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून सर्वात जुना आणि मोठा पक्ष आहे. राज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेस पक्षाला अनुकुल आहे. काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे विधानसभा, लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. (nana patole says congress party is the only capable option)

मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ

ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे जवळपास १४ ते १५ उमेदवार अत्यंत कमी मताने पराभूत झाले आहेत. आता आगामी निवडणुकी जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आपला प्रयत्न असेल. राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी बुथ कमिट्या सक्षम करण्यावर भर द्या. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा, देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला कंटाळली आहे. शेतकरी आंदोलन करत असून त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही, महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्यांकडे केंद्रातील भाजपाचे सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्या आणि समर्पण भावनेने काम केल्यास काँग्रेसची कामगिरी उज्ज्वल होईल, असे पटोले म्हणाले.

“आता कार्यालयावर हल्ला झाला, तर ईट का जवाब पत्थर से देंगे”; भाजपचा थेट इशारा         या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, आ. कुणाल पाटील, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, संजय निरूपम, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, चारुलता टोकस, मधु चव्हाण, रमेश बागवे, वसंत पुरके, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे व डॉ. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण