शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव, राज ठाकरे म्हणाले, अशी माणसं पक्षात सांभाळायची असतील तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 12:57 IST

Raj Thackeray demands action Najib Mulla :

मुंबई - ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची (Jamil Shaikh Murder Case)भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपास करून एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.  या आरोपीने राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला (Najib Mulla) यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर राज ठाकरे (Raj Tjackeray ) यांनी आता या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत नजिब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही, असा इशारा दिला आहे. ( The name of the NCP corporator in the murder of MNS office bearer, Raj Thackeray demands action)याबाबत राज ठाकरे म्हणाले की, मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली होती. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली होती. या आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे. सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. याच नजिब मुल्ला यांचं नाव सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात आलं होतं. पुढे ते प्रकरण निस्तरलं गेलं. पुन्हा या नजिब मुल्लाचं नाव आलं आहे. राज्य सरकार काय कारवाई करतं ते पाहावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच या प्रकरणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे.  यासंदर्भात मी शरद पवार यांची भेट घेणार आहे. अशी जर मंडळी यांना पक्षात सांभाळायची असतील तर दुसऱ्यांचे हात काही बांधलेले नसतात.     खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही. नजिब मुल्ला याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, असे राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे