शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मुकुल रॉय बंगालनंतर अजून एका राज्यात भाजपाला सुरुंग लावणार, बड्या नेत्याला तृणमूलमध्ये आणणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:40 AM

Mukul Roy News: मुकुल रॉय यांच्या घरवापसीनंतर बंगालमध्ये भाजपामधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसची वाट धरल्याने भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. मुकुल रॉय (Mukul Roy ) यांच्या घरवापसीनंतर बंगालमध्ये भाजपामधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यादरम्यानच मुकुल रॉय हे पश्चिम बंगालनंतर अजून एका राज्यात भाजपाला (BJP) सुरुंग लावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांचे निकटवर्तीय असलेले ३० आमदार पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या परिवर्तनाचा प्रभाव त्रिपुरामध्येही दिसण्याची शक्यता आहे. मुकुल रॉय यांचे निष्ठावंत असलेले सुदीप रॉय बर्मन हेसुद्धा तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. (Mukul Roy will undermine the BJP in Tripura after Bengal, bringing a Sudip Roy Barman to the Trinamool Congress)

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे चर्चेत असणारे सुदीप रॉय बर्मन हे पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये आल्यास त्यांच्यासोबत काही आमदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात. त्रिपुरामधील प्रभावशाली नेते मानले जाणारे सुदीप रॉय बर्मन हे मुख्यमंत्रिपदाची माळ बिप्लब देव यांच्या गळ्यात पडल्यापासून नाराज आहेत. ते काँग्रेसमध्ये असताना ते विरोधी पक्ष नेते होते. तर भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष तृणमूल काँग्रेससोबत काम केले होते. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार सुदीप रॉय बर्मन हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मात्र ममता बॅनर्जी यांनी त्याला मान्यता न दिल्यास ते स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवू शकतात. त्यांनी आधीच बंधुर नाम सुदीप नावाची एक संघटना स्थापन केली आहे. ही संघटना पुढच्या काळात भाजपाला विरोध करू शकते.  

त्यामुळे निवडणुकीपूर्वी किंवा नंतर आघाडी बनवण्याशिवाय तृणमूल काँग्रेससाठी दरवाजा उघडा ठेवण्यात मदत मिळेल. त्याशिवाय शाही परिवाराचे प्रमुख प्रद्योत माणिक्य देवबर्मा यांच्यासोबतही बर्मन हे आघाडी करू शकतात. त्यांचा पक्ष TRIPRA स्थानिक निवडणुकीत भाजपाला घेरण्यात यशस्वी ठरला होता.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTripuraत्रिपुराBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण